टीम AM : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी तसंच शिक्के घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत मुंबई पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनिशी शेरे असलेली निवेदनं आणि पत्रं पुढील कार्यवाहीसाठी ठिकठिकाणाहून मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त होत असतात.
या निवेदनांची टपाल शाखेत नोंद होऊन ती ई – ऑफिस प्रणालीत नोंद केली जाऊन संबंधित प्रशासकीय विभागांना पाठवण्यात येतात, नुकत्याच मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त झालेल्या दहा ते बारा निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची बनावट स्वाक्षरी आणि शिक्के असल्याचं लक्षात आल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे.