टीम AM : ‘फॅन्ड्री’ चं कथानक सगळं एका जब्यानं शालूला लिहलेल्या प्रेम पत्रात आहे. हा सगळा सिनेमा एक पानी प्रेम पत्रावर आहे. त्या एका प्रेम पत्रावर visual representation दाखवलं. त्यात तो एक पुर्ण सिनेमाच समोर आला. या पत्रात जब्या आपलं प्रेमाची उपमा आईच्या मायेत शोधतो. तुझ्या आई पेक्षा पण जास्त प्रेम करेल म्हणणं, पण या प्रेमाला तो वासनांध पुरुषी प्रेमाच्या कल्पनेतून बाहेर काढतो. ही एक ओळच प्रेमाला वेगळ्या दर्जावर नेऊन ठेवते. पुढच्या ओळीत गरीबी सोबत मी तुझ्या जातीचा नाही ही hard hitting reality समाजाची विषमता, कुरुपतेला गेलेलं लक्षण अधोरेखित करणं आणि जातीव्यवस्था आपलं व्यक्तिमत्त्व काहीही उभं केलं असेल तरी जब्याचं याच पत्रात शालूला एकदा विश्वास ठेऊन बघ म्हणणं हे जातीने निर्माण केलेल्या व्यक्ती चरित्र व व्यक्ती म्हणून नाकारलेल्या व्यवस्थेच्या आव्हाणाला उभं राहण्याची वैयक्तिक तयारी आहे.

जब्या त्याचं प्रेम लादत नाही. आवडलं नाही तर पत्र फाडुन फेक किंवा आवडलं तर दोन वेन्या घालुन ये… कसल्या innocent माफक अपेक्षा आहेत !! घरच्यांना सांगुन किंवा हसु करु नको म्हणताना पण जब्या त्याच्या चरित्र्याला जपु पाहतो. पटलं तर ठिक, नाही पटलं तर ठिक पण त्या भावनेचं हसं नको व्हायला म्हणत, शेवटी जग त्याला जब्या म्हणत असलं तर जब्या पत्राच्या शेवटी जब्या न लिहता ‘जांबवंत’ लिहुन स्वतःचं मुल्य स्वतः निर्धारित करतो. इथे तो as an individual स्वाभिमानाची लढाई लढतो.
एका फिक्शनला एवढं कसं कोणी organic बनवु शकतं ? हे ‘फॅण्ड्री’ त पाहताना सुखद आहे. एक लेखक, एक दिग्दर्शक म्हणून ही एक अफलातून घडुन आणलेली गोष्ट आहे. क्रियटिव एकदम. नागराज मंजुळे यांनी स्वतः ‘फॅन्ड्री’ तून एक पॅरामिटर तयार केला आणि स्वतःला सुद्धा ‘फॅण्ड्री’ नंतर तो स्थर अजुन पर्यंत तरी गाठता आला नाही. भलाही ‘सैराट’ बॉक्स ऑफिसवर तुफान हिट झाला असेल पण नागराज फक्त ज्यांना सिनेमा कळतो व ज्यांना किमान social reading आहे ते ‘फॅण्ड्री’ साठीच ओळखतील.
– राहुल पगारे