टीम AM : आगामी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, यांनी आज मुंबईत विधानभवनात नामनिर्देशन दाखल केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यावेळी उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मेधा कुलकर्णी, डॉ. अजित गोपछडे आणि अशोक चव्हाण यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले.
शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला. तर काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.
या निवडणुकीसाठी भाजप चौथा उमेदवार देणार नसल्याचं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. त्यामुळे राज्यसभेच्या सहा जागांसाठीची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता असल्याचं ते म्हणाले. गरज पडल्यास या निवडणुकीसाठी येत्या 27 तारखेला मतदान होणार आहे.