माझ्या गावातील कॉलेजला जाणारी मी पहिली मुलगी होते : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 

टीम AM : भारताच्या राष्ट्रपती ‘द्रौपदी मुर्मू’ ह्या आपल्या सर्वांसाठी एक महान प्रेरणा आहेत. देशाचे सर्वोच्च संवैधानिक पद प्राप्त करण्यासाठी त्यांनी आदिवासी भागात प्रवास केला आहे. राष्ट्रपती म्हणतात की, दुर्गम आदिवासी भागातील गरीब घरात जन्मलेल्या मुलीलाही राष्ट्रपती बनवणं ही आपल्या लोकशाहीची ताकद आहे.

एका छोट्या गावातून देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्याच्या त्यांच्या प्रवासाचे वर्णन करताना, द्रौपदी मुर्मू म्हणतात, ‘मी माझ्या आयुष्याचा प्रवास ओडिशातील एका छोट्या आदिवासी गावातून सुरू केला. मी ज्या पार्श्वभूमीतून आले आहे, ते पाहता अगदी प्राथमिक शिक्षण घेणे हे माझ्यासाठी स्वप्नवत होते. पण सर्व अडथळे येऊनही माझा संकल्प पक्का राहिला. मी माझ्या गावातील पहिली मुलगी आहे जी कॉलेजला गेली.

त्या पुढे म्हणतात, ‘मी आदिवासी समाजातील आहे आणि मला वॉर्ड कौन्सिलर ते भारताचा राष्ट्रपती होण्याची संधी मिळाली. लोकशाहीचा जनक असणाऱ्या भारताची हीच महानता आहे.’