हिंदी – उर्दु गझल गायनाने समारोहाचा दुसरा दिवस गाजला
अंबाजोगाई : यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाची दुसऱ्या दिवशीची संध्याकाळ प्रसिद्ध गझल गायक भाविक राठोड आणि धनश्री देशपांडे यांच्या हिंदी आणि उर्दु गझल गायनाने गाजली. उत्कृष्ट वाद्दवृंदाच्या साथीसह “ख्वाबो के गाँव में” या आपल्या हिंदी आणि उर्दु गझल गायनाने त्यांनी रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करुन सोडले.
“ख्वा़ब के गाँव मे” ही हिंदी उर्दु गझलांची मैफल सुरु करण्यापुर्वी आपल्या भारदस्त आवाजात निवेदक नसीर खान यांनी आज २६ नोव्हेंबर असल्यामुळे २६/११ च्या आतिरेक्यांनी केलेल्या बाँम्ब स्फोटात जखमी झालेल्या शहीद जवानांना ही मैफल समर्पित करण्यात येत असल्याचे सांगून या मैफलीची गरीमा वाढवली. आपल्या निवेदनात नसीर खान यांनी २६/११ च्या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांचे, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचेही स्मरण करुन त्यांच्या प्रति आदरभाव व्यक्त करून शहीदांना भावपुर्ण आदरांजली अर्पण केली.
“ख्व़ाब के गाँव मे” या सुरेख मैफलीची सुरुवात भाविक राठोड यांनी “चिठ्ठी न कोई संदेश जाने कोनसा संदेश जाने ओ कोनसा देश जहाँ तुम चले गये…”ही गझल शहीद जावानांप्रति आदरांजली म्हणून गावून केली.या सुरेख गझली नंतर भाविक राठोड यांनी ताहीर खलाम यांची “काश ऐसा कोई मंजर होता, मेरे कांधे पे तेरा सर होता, उसने उलझा दिया दुनिया मे मुझे वरना और एक कलंदर होता..”ही गझल गायली.गझल हा मुळात आरबी भाषेतुन आलेला शब्द आहे. गझला या प्रामुख्याने स्त्री विरह, प्रेम, बेवफा, तिची नफरत या संदर्भात लिहील्या गेल्या आहेत. त्यामुळेच गझल ही स्त्री लिंगी आहे. गझल सांगितल्या जात नाही तर ती गायली जाते. ज्या गोष्टी आपण स्वप्नात पहातो, आपल्या कल्पनेत रंगवतो त्या गोष्टींचा प्रामुख्याने गझलेत समावेश असतो. म्हणूनच या गझल गायनाच्या कार्यक्रमाला “ख्वाब के गाँव मे” हे नांव दिले असल्याचे नसीर खान यांनी आपल्या निवेदनात सांगितले. यानंतर भाविक राठोड आणि धनश्री देशपांडे यांनी “ख्व़ाब के गाँव मे पले हम, पाणी छलनी मे ले चले हम..चाछ फुके थे अपने बचपन मे दुध से किस तरह जले है हम, पाणी छलणी मे ले चले हम…”ही अप्रतिम गझल सादर केली.व्हँलेनटाइन डे ज्या प्रमाणे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. प्रेम हे चोरुन, लपुन-छपुन केले जाते मात्र व्देष, तिरस्कार (नफरत) जगजाहीर केल्या जातो. प्रेम चोरुन का आणि व्देष खुलेआम का? यातली रंजीश सांगणारी महंदी हसन साहेब याची “रंजीश ही सही दिल ही दुखाने के लिए आ , आ फीर से मुझे छोडके जाने के लिए आ..” ही गझल भाविक राठोड यांनी सादर केली.
गझल ही नाजुक असते आणि नजाकत ने पेश केली जाते. गझलने सुरुवाती पासुनच चित्रपटात आपले वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. मदन मोहन यांनी लिहिलेल्या आणि लताजीने गायीलेल्या गझलेची नजाकत काही वेगळीच असते. मदन मोहन यांनी लिहिलेली आणि लताजींनी गायलेली हम है मत और कुछ पुछो, बाजार की तरहा उठती है, हर निगांहे खरीददार की तरहा ” ही सुरेख गझल धनश्री देशपांडे यांनी सादर केली. गझल ही कार्यक्रमात पुढे-पुढे सरकत जाते. या पुढे सरकण्याला फार महत्त्व आहे. तरुणीच्या छातीवरील दुप्पटा, स्त्रीच्या डोक्यावरील पदर पुढे सरकतांना गझल काय म्हणते हे सांगणारी” सरकती जान है रुख से नकाब आहिस्ता आहिस्ता, हमारे और तुम्हारे प्यार मे फर्क है बस इतना, इधर तो जल्दी जल्दी हैउधर तो आहिस्ता आहिस्ता..” ही गझल भाविक राठोड यांनी सादर केली.
अमीर मिनाइ, मिर्झा गालीब या जुन्या गझलकारानंतर डॉ. शफी हसन, नासीर कलाम या नव्या गझलकाराच्या गजला नंतर प्रसिद्ध झाल्या. या नासीर काझमी यांचा कलाम “गये दिनोंका सुराग लेकर इधर से आया, किधर गया वो अजीब मानो अजनबी था मुझे हैराण कर गया, ओ गये दिनोंका सुराग लेकर…”भाविक राठोड आणि धनश्री देशपांडे यांनी गायला. डॉ. सफी हसन साहब यांचा “हाजीर” या अलबम मधील कलाम” मरीज इश्क का क्या है जिया जिया ना जिया के साँस घबराह के लिया, लिया ना लिया है, है एक साँस का झगडा लिया लिया ना लिया है..”
हसरत मुहानी यांचे गझलेमध्ये खुप नांव आहे. हसरत मुहानी यांनी लिहिलेली आणि गुलाम अली यांनी गायलेली “चुपके चुपके रात दिन आसू बहाना याद है, हम को अब तक आशिकी का जमाना याद है” ही गझल भाविक राठोड यांनी सादर केली.गझल गायनात बेगम अख्तर यांच मोठ नाव आहे. गझल गायनामुळेच बेगम अख्तर यांना पद्मश्री, पद्मभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याच बेगम अख्तर यांनी डॉ. शफी हसन यांची “ए मोहब्बत तेरे अंजाम से रोना आया जा ने क्यु आज तेरे नाम से रोना आया..”ही गझल धनश्री देशपांडे यांनी सादर केली. “ख्व़ाब के गाँव मे” या कार्यक्रमात भाविक राठोड यांनी एका पेक्षा एक सरस असणाऱ्या अनेक गझलांचे उत्कृष्ठ सादरीकरण केले. या कार्यक्रमाला वेगळे महत्त्व प्राप्त करुन दिले ते नसीर खान यांच्या भारदस्त आणि आशयपुर्ण संदर्भ देत केलेल्या निवेदनाने. त्यात अधिक भर टाकली ती देवेंद्र यादव यांनी साथसंगत दिलेल्या तबल्याने आणि रोहीत बनकर यांनी नजाकतीने वाजवलेल्या बासरीने!
“ख्व़ाब के गांव मे” या हिंदी-उर्दु गझलांच्या सुरेल मैफलीत प्रख्यात गझल गायक भाविक राठोड आणि धनश्री देशपांडे यांच्या गायनाला देवेंद्र यादव (तबला), रामेश्वर काळे (सिंथसायझर), रोहीत बनकर (बासरी), मिलिंद शेवरे (गिटार), प्रशांत ठाकरे (रिदम), प्रविण काळे (संवादिनी) यांनी अतिशय उत्कृष्ट साथसंगत दिली तर या कार्यक्रमाचे उत्कृष्ठ निवेदन नसीर खान यांनी केले. नोव्हेंबरच्या बोचऱ्या थंडीत या कार्यक्रमाचा रसिक श्रोत्यांनी मनमुराद आस्वाद घेतला.