महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण ? : रितेश – जिनिलीयाच्या ‘वेड’ ने मारली बाजी 

टीम AM : महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण ? हा गाजलेला पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. गेल्या वर्षभरात प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपट आणि संबंधित विभागांमधील अनेकांचा या पुरस्कार सोहळ्यात सन्मान करण्यात येतो. या सोहळ्यात रितेश देशमुख आणि जिनिलीया यांनी बाजी मारली आहे. रितेश देशमुख आणि जिनिलीया या पुरस्कार सोहळ्यात सगळ्यांवर भारी पडले आहेत. त्यांच्या ‘वेड’ चित्रपटाला महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण ? मध्ये तब्बल 9 पुरस्कार मिळाले आहेत. रितेशने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. 

रितेश – जिनिलीयाच्या ‘वेड’ ने महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण ? पुरस्कार सोहळ्यात मोहोर उमटवली आहे. महाराष्ट्राचा फेव्हरेट सिनेमा ठरण्याबरोबरच ‘वेड’ ने अनेक पुरस्कार नावावर केले आहेत. रितेशने जिनिलीयाबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्या दोघांच्याही हातात पुरस्कार दिसत आहेत. 

रितेश देशमुखने पोस्ट शेअर करत झी टॉकीज आणि प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. 30 डिसेंबर 2022 रोजी ‘वेड’ सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला होता. या सिनेमातून रितेशने दिग्दर्शनात पाऊल ठेवलं होतं. तर जिनिलीयाने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. रितेश – जिनिलीया मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमाने महाराष्ट्राला अक्षरश: ‘वेड’ लावलं होतं.