टीम AM : गुजरातमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. वडोदरामध्ये हलणी तलावामध्ये विद्यार्थ्यांनी भरलेली बोट बुडाली आहे. या अपघातात 12 विद्यार्थ्यांसह 2 शिक्षकांचा बुडून मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 10 जखमी विद्यार्थ्यांना वाचवण्यात आले आहे. या घटनेत जखमी झालेल्या 7 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 4 शिक्षकांसह 23 विद्यार्थी बोटीवर होते. अजूनही अनेक विद्यार्थी बेपत्ता आहेत. हरणी तलावावर एका शाळेतील विद्यार्थी हे सहलीसाठी आले होते. बोटीने प्रवास करत असताना अचानक ही घटना घडली. बोट बुडाल्यामुळे 12 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर 2 शिक्षकांचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत 6 जणांना वाचवण्यात आलं आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे.