बीड जिल्हा प्रशासनाचे आवाहन
टीम AM : कुणबी, मराठा – कुणबी, कुणबी – मराठा जातीचे प्रमाणपत्र हवे असेल अशा व्यक्तींनी जात प्रमाणपत्राबाबतचा अर्ज भरून, आवश्यक पुराव्यांसह नजीकच्या महा – ई – सेवा केंद्राकडे दाखल करण्याचे आवाहन बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
बीड जिल्हयामध्ये अभिलेख्यांच्या तपासणीअंती कुणबी – मराठा, मराठा – कुणबी व कुणबी इत्यादी नोंदी आढळून आलेले मराठी भाषेतील अभिलेखे तसेच सदर अभिलेख्यांमधील मोडी, उर्दू भाषेतील अभिलेखे ही मराठी भाषेत भाषांतरीत करुन जिल्हयाच्या beed.gov.in या संकेतस्थळावर अपलोड करुन नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. सदर अभिलेख्यांची गावनिहाय, विभागनिहाय, अभिलेख प्रकार निहाय व व्यक्ती निहाय नोंदींची यादी संबंधीत तहसीलदार यांच्या मार्फत करण्यात येत असून सदर यादी गावाच्या ग्रामपंचायतीच्या व तलाठी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येत आहे.
तरी ज्या पात्र व्यक्तीस कुणबी, मराठा – कुणबी, कुणबी – मराठा जातीचे प्रमाणपत्र हवे असेल अशा व्यक्तींनी जात प्रमाणपत्राबाबतचा अर्ज भरून, आवश्यक पुराव्यांसह नजीकच्या महा – ई – सेवा केंद्राकडे दाखल करण्याचे आवाहन बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.