टीम AM : अंबाजोगाई शहरात एक खळबळजनक घटना घडली आहे. शहरातील अजमेरनगर भागात युवकाचा संशयास्पद मृतदेह आढळला आहे. ईश्वर अरुण जोगदंड [वय 30, रा. परळी वेस, अंबाजोगाई] असं मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.
मंगळवार दि.16 जानेवारी रोजी सकाळी सदरील युवकाचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलीस घटनास्थळी दाखल होत त्यांनी मृतदेह स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविला.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गर्दी करत ठिय्या धरला. या घटनेचा अधिक तपास अंबाजोगाई शहर पोलीस करित आहेत.