टीम AM : भारतीय हवामान विभागाच्या पुणे विभागीय केंद्राद्वारे 19 जानेवारीनंतर राज्यात थंडीची लाट जाणवेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. थंडीची लाट राज्यातील विविध भागात जाणवेल आणि तापमान कमी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या पुणे विभागीय केंद्राचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. जानेवारीत राज्यातील कमाल तापमान राज्यभरात सामान्य तापमानापेक्षा कमी असेल. 19 जानेवारी ते 25 जानेवारी दरम्यान या कालावधीत राज्यभरातील तापमान किमान तापमानापेक्षा कमी असेल, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
अनुपम कश्यपी यांनी राज्यात मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात किमान तापमान थोडंसं वाढलेलं 19 जानेवारीपर्यंत जाणवेल, असं म्हटलं आहे.