अंबाजोगाईत रंगला कुस्त्यांचा फड : मुलीही उतरल्या आखाड्यात

टीम AM : आद्यकवी मुकुंदराज स्वामी यांच्या यात्रेनिमित्त मुकुंदराज स्वामी क्रिडा मंडळ व व्यायाम शाळा यांच्या वतीने दरवर्षी कुस्त्यांच्या स्पर्धेचे आयोजन केले जाते. याही वर्षी मुकुंदराज स्वामींच्या समाधी परिसरात हालक्यांच्या खणखणाटात कुस्त्यांचा फड रंगला. संपुर्ण महाराष्ट्रभरातून या स्पर्धेसाठी कुस्तीपटू सहभागी झाले होते.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नगरपरिषदेचे मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे, मुकुंदराज संस्थानचे ह.भ.प.किसन महाराज पवार, माजी उपनगराध्यक्ष सारंग पुजारी तर संयोजन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत लोंढाळ, उपाध्यक्ष वसंत साळवे, सचिव प्रशांत आदनाक, जीवन कराड, सुखदेव देवकते, मधुकर काळे, अविनाश भोसले, बळीराम राख, गणपत मुंडे यांची उपस्थिती होती. यावेळी सात गटात कुस्त्यांचा आखाडा रंगला. या कुस्ती स्पर्धेचे बक्षीस वितरण माजी आ. संजय दौंड यांच्या हस्ते झाले. यावेळी शहरवासियांनी कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. 

पहिल्याच वर्षी झाल्या मुलींच्या कुस्त्या

मुकुंदराज स्वामी क्रीडा मंडळ व व्यायाम शाळा, अंबाजोगाई यांच्या वतीने दरवर्षी मुकुंदराज स्वामींच्या यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धा घेतली जाते. मात्र, या वर्षी पहिल्यांदाच मुलीही कुस्तीच्या आखाड्यात उतरल्या व त्यांनी न लाजता न डगमगता मुलांसोबत कुस्ती खेळली व बक्षीसही मिळविले. यावर्षी पासून सुरू झालेल्या या मुलींच्या कुस्त्या पुढच्या वर्षी मोठे रूप धारण करणार असल्याचे संयोजन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत लोंढाळ व सचिव प्रशांत आदनाक यांनी सांगितले. या कुस्ती स्पर्धेत वैष्णवी सोळंके (जालना), ऋतुजा शिंदे (होळ), दिव्या खाडे (होळ) या मुलींनी सहभाग नोंदविला.

कुस्तीतील बक्षीस विजेते

◾खुला गट – प्रथम – बाळु बहिरवाल (आष्टी – पाटोदा), रोख रक्कम 25 हजार रूपये, द्वितीय – भरत कराड (रामेश्‍वर जि.लातूर) रोख रक्कम 15 हजार, तृतीय – प्रदिप गोरे (लातूर) रोख रक्कम 11 हजार

◾84 किलो गट –  प्रथम – भाऊ वणवे, रोख रक्कम 15 हजार, द्वितीय  – प्रदिप काळे, रोख रक्कम 10 हजार, तृतीय – सोमनाथ माने, रोख रक्कम 6 हजार 

◾74 किलो गट –  प्रथम – सचिन शिर्के, 10 हजार, द्वितीय – रमेश चव्हाण 7  हजार, तृतीय – अमर कदम 5 हजार

◾66 किलो गट – प्रथम – तुशार खामकर, 8 हजार, द्वितीय – अमन शेख 6 हजार, तृतीय – समाधान भोसले 4 हजार रूपये 

◾61 किलो गट – प्रथम – दयानंद सलगर, 7 हजार, द्वितीय – आशिष नेहराळे 5 हजार, तृतीय – बाळु जमादार 3 हजार रूपये 

◾57 किलो गट – प्रथम – श्रीकांत शेंगर, 6 हजार, द्वितीय – नारायण गिरी 4 हजार, तृतीय – शुभम कारले 2 हजार रुपये

◾50 किलो गट – प्रथम – लहु चौरे 4 हजार, द्वितीय – अजय बहिरवाल 2 हजार, तृतीय – शुशांत कांबळे 1 हजार रुपये, अशी बक्षीसे देण्यात आली.