टीम AM : खरीप हंगाम – 2023 मध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केलेल्या 1 हजार 21 मंडळांपैकी ज्या मंडळांचे विभाजन होऊन नवीन महसुली मंडळ स्थापन करण्यात आली आहेत, त्यामध्ये देखील दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.
नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमुळे बाधित होणाऱ्या आपदग्रस्तांना तातडीने मदत देण्यासाठी गठीत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला.
मदत, पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी ही माहिती दिली. या बैठकीत उपसमितीनं राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन पाणीपुरवठा आणि चारा टंचाई निवारण करण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना संबधित विभागांना दिल्या आहेत.