सचिन तेंडुलकरने केले ‘पंचक’ चे कौतुक : सोशल मीडियावरून दिल्या शुभेच्छा

टीम AM : जयंत जठार दिग्दर्शित ‘पंचक’ या चित्रपटाचे कौतुक खुद्द क्रिकेटर सचिन तेंडुलकरने केले आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडियावरून ‘पंचक’ चे कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत. 

‘अनेक कॅरेक्टर्स आणि त्याहूनही जास्त विनोदी. ‘पंचक’ हा फॅमिली बरोबर बघण्यासारखा आणि खूप खूप हसवणारा चित्रपट आहे. दिलीप प्रभावळकर यांची ऍक्टिंग चित्रपटाला अजून समृद्ध करेल. निर्माते माधुरी दीक्षित नेने, डॉ. श्रीराम नेने ह्यांना मराठी सिनेमाला प्रोत्साहन देण्यासाठी धन्यवाद. या शब्दांमध्ये सचिन तेंडुलकर यांनी चित्रपटाचे कौतुक केले आहे. 

या चित्रपटाची निर्मिती डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दिक्षित – नेने यांची असून राहुल आवटे आणि जयंत जठार या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.