टीम AM : सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ॲनिमल चित्रपटातील बॉबी देओलच्या एंट्रीच्या गाण्यावर आजी – आजोबांनी खूप छान डान्स केला आहे. त्यांचा हा डान्सचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओत आजी सर्वप्रथम चहा करताना दिसत आहे. त्यानंतर चहाचा कप डोक्यावर घेऊन त्या बॉबी देओलच्या गाण्यावर नाचायला लागतात. कप डोक्यावर घेऊन त्या हॉमध्ये येऊन आजोबांसोबत नाचू लागतात.
आजोबादेखील आजीसोबत डान्स करतात. त्यानंतर ते आजीच्या डोक्यावरील कप घेतात आणि चहा पितात. व्हिडिओत आजी – आजोबांचा डान्स पाहून मात्र त्यांच्या मुलाला आणि नातीला आश्चर्याचा धक्का बसल्याचे दिसत आहे. हे दोघेही आजी – आजोबांचा हा डान्स बघून डोक्याला हात लावतात. त्यांची ही रिॲक्शन खूपच भारी आहे.
sidbobadi21 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आजी – आजोबांचा हा व्हिडिओ खूपच मजेशीर आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. ‘आजी आजोबा रॉक्स’, ‘आजी आजोबांचा डान्स लय भारी’ अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत