बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडेंची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह : ट्विटरवर दिली माहिती

टीम AM : राज्यात आणि देशात कोरोना संसर्ग पुन्हा वाढीस लागला असून अनेक ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळू लागले आहेत. अशातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

धनंजय मुंडे यांना गेल्या काही दिवसांपासून खोकल्याचा त्रास सुरू होता. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी त्यांनी कोरोना चाचणी केली असता ही चाचणी पॉझिटिव्ह आली. तेव्हापासून मुंडे हे पुण्यातील आपल्या घरी विलगीकरणात असून तिथेच ते औषधोपचार घेत आहेत.

पुण्यातील मॉडर्न कॉलनी परिसरात मंत्री धनंजय मुंडे यांचे घर आहे. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यापासून या घरी ते राहात असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. मात्र, कोरोना चाचणी निगेटिव्ह येईपर्यंत ते पुण्यातील घरीच विलगीकरणात राहतील, अशी माहिती आहे.