टीम AM : जगामध्ये JN.1 या कोरोना विषाणूमुळे फ्रान्स, अमेरिका, सिंगापुर, कॅनडा, युनायटेड किंगडम, स्विडन या देशांमध्ये या विषाणूची लागण मोठया प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच भारतामध्ये केरळ या राज्यामध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे. तरी बीड जिल्ह्यामध्ये कोरोना तसेच कोरोनाच्या JN.1 प्रकारच्या विषाणूचा प्रसार होऊ नये, म्हणून जनतेने खालील प्रमाणे काळजी घ्यावी. जेणेकरून बीड जिल्ह्यात या आजाराचा प्रसार आपणास रोखता येईल.
◾ गर्दीच्या ठिकाणी जात असताना सर्वांनी मास्कचा वापर करावा.
◾ प्रवाशांनी प्रवासामध्ये मास्कचा वापर करावा. घरी आल्यानंतर सर्वांनी साबणाने स्वच्छ हात धुवावेत.
◾ सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर हात कोणत्याही पृष्ठभागास लावू नयेत.
◾ त्याचबरोबर शक्यतोवर हस्तांदोलन करणे टाळावे.
◾ शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. परंंतू, जाणे आवश्यक असल्यास सार्वजनिक ठिकाणी मास घालून जावे आणि खोकताना किंवा शिकताना नाका – तोंडावर रुमाल किंवा मास्क असणे आवश्यक आहे.
◾ सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर उघड्यावर थुंकू नये.
◾ हातांच्या स्वच्छतेकरिता वारंवार हात स्वच्छ पाण्याने धुवावेत व सॅनिटायझरचा वापर करावा.
◾ सर्दी, ताप, खोकला इत्यादी लक्षणे असल्यास तात्काळ डॉक्टरांना दाखवून उपचार सुरू करावेत.
◾ सर्दी, ताप, खोकला इत्यादी लक्षणे असल्यास उपचार घेणे टाळण्यात येऊ नये.
◾ लग्न समारंभ इत्यादी ठिकाणी लोकांनी मास्क घालून जावे, त्या ठिकाणी सामाजिक अंतर ठेवावे तसेच सॅनिटाझरचा वापर त्या ठिकाणी असावा.
◾ मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, किडनीचा आजार, श्वसनसंस्थेचे आजार असलेले रुग्ण यांनी वैद्यकीय सल्ला घेऊन आपले आरोग्य चांगले राहिल याची काळजी घ्यावी.
◾ त्याचबरोबर वृद्ध व्यक्ती, गरोदर माता, एक वर्षाच्या आतील बालके, इत्यादींनी सार्वजनिक ठिकाणी तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.