बेघर तृतीयपंथी यांना घरकुल योजनेचा लाभ द्या : मुख्याधिकारी, तहसीलदार यांना दिले निवेदन
टीम AM : शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानूकुल करण्यात यावीत व बेघर तृतीयपंथी यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर रोजी नगरपरिषद परिसरात धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुख्याधिकारी, नगरपरिषद व तहसीलदार यांना निवेदन देत म्हटले आहे की, शासन निर्णयाद्वारे महाराष्ट्र शासनाने वेगवेगळे आदेश काढुन शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानूकुल करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले आहे. तरीही नगरपरिषद कार्यालयाकडून या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली नाही. यामुळे अंबाजोगाई शहरातील अतिक्रमीत भागात राहणाऱ्या बेघरांणा घरकुल योजनेसह इतर योजनेचा लाभा अद्यापही मिळाला नाही.
शासन निर्णयाच्या आधारे तसेच बीड जिल्ह्यातील गेवराई, नगर परिषद भागाच्या हद्दीतील अतिक्रमणे नियमानूकुल झाले आहेत आणि त्यांना विविध योजनेचा लाभ मिळाला आहे. त्याच धरतीवर शासन निर्णयाची अंमलबजावणी करून अंबाजोगाई नगरपरिषद मधील अतिक्रमीत जागेवरील भोगवटाधारकांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा तसेच बेघर तृतीयपंथीयांना निवाऱ्यासाठी जागा उपलब्ध करून देऊन घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर नंदिनी, दिव्या, तमन्ना, रविना, बब्बी, इशु, निकिता, कल्याणी, लावण्या, आदा, संजना, सानिया, माधुरी, पल्लवी, पायल यांच्यासह आदींच्या सह्या आहेत. तसेच यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाअध्यक्ष शैलेश कांबळे, गोविद मस्के, अमोल पौळे, नितीन सरवदे, सतिष सोनवणे, रशीद शेख यांची उपस्थिती होती.