नोकरीची सुवर्णसंधी : राज्यातील विविध जिल्हा न्यायालयात ‘मेगा भरती’, ‘ही’ आहे शेवटची तारीख

टीम AM : नोकरीच्या शोधात असलेल्या इच्छुकांसाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, राज्यातील विविध जिल्हा न्यायालयात रिक्त पदांसाठी भरती केली जात आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवारांनाही नोकरी मिळण्याची शक्यता आहे. या भरती प्रक्रियेत एकूण 4629 पदे भरली जाणार असून, यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 1,22,800 पर्यंत पगार मिळू शकेल.

राज्यातील विविध जिल्हा न्यायालयात लघुलेखक (ग्रेड-3), कनिष्ठ लिपिक आणि शिपाई / हमाल या पदांसाठी भरती केली जात आहे. यात ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या पदासाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेला 4 डिसेंबर 2023 पासून सुरुवात होणार असून, 18 डिसेंबर, 2023 ही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख असणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला संपूर्ण महाराष्ट्रात कुठंही जाऊन नोकरी करावी लागणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : लघुलेखक (ग्रेड-3), कनिष्ठ लिपिक आणि शिपाई / हमाल
– एकूण रिक्त पदे : 4629 पदे.

– नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.
– शैक्षणिक पात्रता : सातवी उत्तीर्ण आणि माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.

– वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट).
– वेतन / मानधन : दरमहा 15,000/- ते 1,22,800/- पर्यंत.

– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 4 डिसेंबर 2023.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 डिसेंबर 2023.

– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट www.bhc.gov.in वरून माहिती घेता येऊ शकणार आहे.