प्रवाशांना दिलासा : दक्षिण मध्य रेल्वेच्या विशेष गाड्यांना मुदतवाढ  

टीम AM : प्रवाशांची गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेनं काचीगुडा – लालगढ – काचीगुडा, हैदराबाद – जयपुर – हैदराबाद आणि नांदेड ते इरोड दरम्यान सुरू असलेल्या विशेष गाड्यांना मुदतवाढ दिली आहे. या गाड्या निजामाबाद, नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशिम, अकोला मार्गे धावतात.

काचीगुडा – लालगड ही गाडी 27 जानेवारीपर्यंत, लालगढ – काचीगुडा 30 जानेवारीपर्यंत, हैदराबाद – जयपूर गाडी 26 जानेवारी पर्यंत, तर जयपूर – हैद्राबाद आणि नांदेड – इरोड गाडीला 28 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

दरम्यान, लाईन ब्लॉकमुळे दौंड ते निझामाबाद जलदगती गाडी 3 ते 16 जानेवारी दरम्यान तर निझामाबाद – पंढरपूर गाडी 4 ते 17 जानेवारी दरम्यान निझामाबाद ते मुदखेड दरम्यान अंशत: रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वेच्या जनसंपर्क विभागानं दिली आहे.