संविधान दिन : सर्वोच्च न्यायालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

टीम AM : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सर्वोच्च न्यायालयाच्या प्रागंणामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. भारतामध्ये आज 26 नोव्हेंबर संविधान दिवस म्हणून साजरा केला जात आहे. 

या सोहळ्याला सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, केंद्रीय न्याय मंत्री अर्जून राम मेघवाल यांंच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना लिहली असून 26 नोव्हेंबर 1949 मध्ये राज्यघटनेला मान्यता मिळाली असल्याने आज त्यांच्या स्मरणार्थ संविधान दिवसाचं औचित्य साधत त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे.