नांदेड – अमृतसर, जम्मू – तावी हमसफरसह काही रेल्वे तात्पुरत्या रद्द : जनसंपर्क विभागाची माहिती 

टीम AM : मथुरा रेल्वे स्थानकावर घेण्यात येणाऱ्या तांत्रिक कामामुळं काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयानं या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार नांदेड – अमृतसर सचखंड जलद रेल्वे 21 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2024 दरम्यान, तर अमृतसर – नांदेड सचखंड गाडी 23 जानेवारी ते सहा फेब्रुवारी दरम्यान रद्द करण्यात आली आहे. 

नांदेड – जम्मू तावी हमसफर साप्ताहिक जलद रेल्वे 26 जानेवारी आणि 2 फेब्रुवारी दरम्यान रद्द झाली आहे. जम्मू तावी – नांदेड हमसफर साप्ताहिक 28 जानेवारी आणि 4 फेब्रुवारी रोजी, नांदेड – हजरत निजामुदिन साप्ताहिक गाडी 23 आणि 30 जानेवारी रोजी तर हजरत निजामुदिन – नांदेड साप्ताहिक जलद रेल्वे येत्या 24 आणि 31 जानेवारी रोजी रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वेच्या जनसंपर्क विभागानं दिली आहे.