टीम AM : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे. राज्य सरकारने चार टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवला आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे महागाई भत्ता आता 42 टक्क्यावरुन 46 टक्के करण्यात आला आहे. एक जुलै 2023 पासूनची महागाई भत्त्याची थकबाकीही मिळणार आहे. राज्य सरकारकडून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आलाय.
मागील अनेक दिवसांपासून महागाई भत्ता वाढवण्याची मागणी करण्यात येत होती. वर्षातून दोन वेळा महागाई भत्ता वाढवला जातो. आज अर्थ विभागाने शासन निर्णय काढून महागाई भत्ता वाढवण्यात येत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. याआधी 30 जून 2023 रोजी राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ केली होती.