ऐतिहासिक : सुप्रीम कोर्टात उभारला जाणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा

टीम AM : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सुप्रीम कोर्टात उभारण्यात येणार आहे. ही ऐतिहासिक घटना असणार आहे. कारण न्यायालयाच्या परिसरात देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा पुतळा उभारला जाणार आहे.

सरन्यायाधीश चंद्रचुड यांचा पुढाकार

भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या पुढाकाराने पुतळा उभारला जाणार आहे. हरियाणातील मानेसर इथं हा पुतळा बनवण्यात आला असून त्याचं कामही आता पूर्ण झालं आहे. त्यामुळं 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त राष्ट्रपती द्रोपर्दी मुर्मू यांच्या हस्ते सुप्रीम कोर्टाच्या आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच अनावरण होणार आहे.