टीम AM : आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांना अंबाजोगाईच्या अपर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती देण्यात आली आहे. कुमावत यांनी आपल्या कार्यशैलीने जिल्ह्यात दबदबा निर्माण केलेला आहे. दरम्यान, कुमावत यांच्या नियूक्तीसंदर्भात गृहविभागातील वरिष्ठांकडून दुजोरा मिळाला आहे.
आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांच्याकडे केज पोलीस उपविभागाचा पदभार देण्यात आला होता. मागच्या दीड वर्षाच्या काळात कुमावत यांनी या पदावरून जिल्ह्याभरात दबदबा निर्माण केला. अवैध धंद्यांसोबतच गुटखा, जनावरांची तस्करी यासह वाळू तस्करीवर त्यांनी मोठ्या कारवाया केल्या आहेत. पंकज कुमावत यांनी जिल्ह्याभरात केलेल्या कारवायांमुळे त्यांच्या नावाची आजही अनेकांना धडकी भरते. पंकज कुमावत यांना आता अंबाजोगाईचे अपर पोलीस अधिक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.