खासगी अनुदानित शाळांना 49 कोटी रुपये अनुदान मंजूर : आदेश जारी

टीम AM : राज्यातल्या खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना 2023 – 24 या आर्थिक वर्षातील वेतनेतर खर्च भागवण्यासाठी 49 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आलं आहे. हे अनुदान वितरित करण्यासंबंधीचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. 

शासन निर्णयानुसार 49 कोटी 17 लाख 78 हजार 507 रूपये इतका निधी वेतनेतर अनुदान मंजूर करण्यात आला आहे. 

गुणवत्तेनुसार सर्वात जास्त पटसंख्या असलेल्या आणि प्रत्यक्ष सुरू असलेल्या शाळांना प्राधान्य देऊन वेतनेतर अनुदान वितरित करण्यात यावं, असं शासन निर्णयातील आदेशात नमूद करण्यात आलं आहे.