पतीच्या ‘या’ सवयीला कंटाळून झीनत अमान यांनी घेतला होता घटस्फोट

टीम AM : बॉलिवूड विश्वात नवे ट्रेंड आणणारी बोल्ड अभिनेत्री म्हणून झीनत अमान यांचे नाव घेतले जाते. बॉलिवूडचा चेहरामोहरा बदलण्यात झीनत अमान यांचा मोठा वाटा आहे. पुरुषप्रधान चित्रपटांच्या काळात झीनत अमान यांनी चित्रपटातील अभिनेत्रीचे महत्त्व अधोरेखित केले.

झीनत या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे विशेष चर्चेच असायच्या. आज 19 नोव्हेंबर रोजी झीनत यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही खास गोष्टी…

झीनत अमान यांनी अभिनेता मजहर खान सोबत लग्न केले होते. त्यांच्या वैवाहिक आयुष्यात अनेक चढउतार आले, त्यामुळेही या कपलची कायमच चर्चा झाली. परंतु एका मुलाखतीत झीनत यांनी पतीसोबत असलेल्या संबंधावर भाष्य केले होते.

झीनत आणि मजहर यांचे 1985 मध्ये लग्न झाले होते. त्यानंतर त्यांना अजान आणि जहान नावाचे दोन मुलेदेखील झाली. परंतु त्यांच्यात सतत वाद होत असायचे. जेव्हा मतभेद टोकाला पोहोचले तेव्हा झीनतने पती मजहरवर मारहाणीचा आरोप करत कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. त्यानंतर दोघांनीही विभक्त राहण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर मजहर यांना ड्रग्ज आणि दारुचे व्यसन असल्याचे बोलले जात होते.

1998 साली मजहर यांचे निधन झाले. त्यावेळी झीनत यांनी मीडियाशी बोलताना सांगितले होते की ‘त्यांचे निधन होईल असे मला कधी वाटले नव्हते, मला वाटले होते ते आजारातून बरे होतील, मला त्यांच्या निधनामुळे फार दुख: झाले आहे.’ परंतु मजहर यांना अखेरच्या क्षणी पाहण्यासाठी आणि अंत्ययात्रेत येण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी परवानगी दिली नव्हती.