टीम AM : सरकारी बँकेत नोकरी करण्यास इच्छुक असलेल्यांसाठी खूशखबर आहे. भारतीय स्टेट बँकेत (एसबीआय) तब्बल 8283 जागांसाठी मेगाभरती सुरू झाली आहे. भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
एकूण जागा
‘एसबीआय’ या भरतीत 8283 जागा भरणार आहे. यामध्ये खुल्या गटासाठी 3515, 1284 अनुसूचित जातींसाठी, 748 अनुसूचित जमातीसाठी, 1919 ओबीसीसाठी आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी 817 जागा राखीव आहेत.
पदाचे नाव : ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 एप्रिल 2023 रोजी 20 ते 28 वर्षे [एससी/एसटी : 5 वर्षे सूट, ओबीसी : 3 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस -750 रुपये [SC/ST/PWD/ExSM : फी नाही]
पगार : रु.17900-1000/3-20900-1230/3-24590-1490/4-30550-1730/7-42600-3270/1-45930-1990/1-47920.
सुरुवातीचे मूळ वेतन -19900 रुपये आहे (रु.17900/- तसेच पदवीधरांना दोन आगाऊ वाढीव स्वीकार्य)
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 7 डिसेंबर 2023
परीक्षा
पूर्व परीक्षा : जानेवारी 2024
मुख्य परीक्षा : फेब्रुवारी 2024
उमेदवारांना प्रिलिम्स आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण करावी लागतात. पूर्वपरीक्षा 100 गुणांची असेल. तर मुख्य परीक्षेत 200 गुणांचे 190 प्रश्न असतील. 100 गुणांची वस्तुनिष्ठ चाचणी ऑनलाइन घेतली जाईल. ही चाचणी 1 तास कालावधीची असेल ज्यामध्ये 3 विभाग असतील – इंग्रजी भाषा, संख्यात्मक क्षमता आणि तर्क क्षमता. पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल. मुख्य परिक्षेत यशस्वी झालेल्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. त्यानंतर अंतिम निकाल जाहीर होईल.