टीम AM : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी – 20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने भारतीय संघ पूर्णपणे बदलला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेत अनेक नवीन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
भारताचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याला या मालिकेसाठी कर्णधार बनवण्यात आले आहे. तर ऋतुराज गायकवाडची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. याशिवाय, या मालिकेत अनेक नवीन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
रिंकू सिंहला मिळाली संधी
दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी – 20 मालिकेत भारताच्या अनेक विस्फोटक खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. या मालिकेत आयपीएलदरम्यान खळबळ माजवणारा स्टार खेळाडू रिंकू सिंहचा संघात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय, स्फोटक फलंदाज यशस्वी जयस्वालचा संघात समावेश करण्यात आला आहे. विकेटकीपर फलंदाज जितेश शर्मालाही संघात स्थान मिळाले आहे. विश्वचषकादरम्यान वॉशिंग्टन सुंदरच्या निवडीची बरीच चर्चा झाली होती, त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत संधी मिळाली आहे.
भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार.