टीम AM : रायगड जिल्ह्यात कर्जत – नेरळ मार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. आज पहाटे चार वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
पत्रकार धर्मांनंद गायकवाड आपल्या सहकाऱ्यांसह कर्जतहून नेरळकडे जात होते. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं ती किरवली पुलाजवळ थेट पनवेल – कर्जत रेल्वे मार्गावर कोसळली. त्याच वेळी येणाऱ्या मालगाडीनं चारचाकीला जोराची धडक दिली.
या अपघातात धर्मांनंद गायकवाड यांच्यासह चारचाकीमधील तिघे जागीच ठार झाले असून दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेेेेचा अधिक तपास पोलीस करित आहेत.