टीम AM : बॉलिवूड आणि दक्षिणात्य इंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेते कमल हासन आज 7 नोव्हेंबरला आपला 70 वा वाढदिवस साजरा करत आहेत. 7 नोव्हेंबर 1954 रोजी जन्मलेले कमल हासन त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. ते दक्षिणात्य सिनेसृष्टीचे सुपरस्टार आहेत ज्यांनी हिंदी चित्रपटांमध्येही आपला प्रभाव निर्माण केला आहे. एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच, कमल एक दिग्दर्शक, पटकथा लेखक, निर्माता आणि पार्श्वगायक देखील आहे. कमल यांनी बालकलाकार म्हणून चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. 1975 मध्ये त्यांनी ‘अपूर्व रागांगल’ मधून पदार्पण केले. कमल हासन त्यांच्या चित्रपट आणि अभिनयासोबतच त्यांच्या लव्ह लाईफमुळेही चर्चेत असतात. विशेष म्हणजे कमल हसन यांचे दोनदा लग्न झाले असले तरी ते सिंगलच आहेत. कमल हासनची दोन्ही लग्न अयशस्वी ठरली. चला जाणून घेऊया अभिनेत्याच्या लव्ह लाईफबद्दल…
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कमल हासन आपल्या आयुष्यात आतापर्यंत पाच महिलांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. कमल हासन यांनी 1970 च्या दशकात अभिनेत्री श्रीविद्यासोबत काही चित्रपटांमध्ये काम केले होते. रिपोर्ट्सनुसार, याच काळात कमल हासन आणि श्रीविद्या यांच्या अफेअरच्या बातम्या गाजल्या होत्या. मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. यानंतर कमल यांनी 1978 मध्ये वाणी गणपतीशी लग्न केले आणि 10 वर्षांनंतर दोघेही वेगळे झाले.
वाणीपासून घटस्फोट घेतल्यानंतर कमल हासनचे नाव अभिनेत्री सारिकासोबत जोडले गेले. रिपोर्ट्सनुसार, लग्नाआधीच दोघेही एका मुलीचे म्हणजेच अभिनेत्री श्रुती हसनचे पालक झाले होते. यानंतर दोघांनी लग्न केले. लग्नानंतर कमल हासन आणि सारिका यांना मुलगी अक्षरा हासनचा जन्म झाला. कमल हासन आणि सारिकाचे नातेही फार काळ टिकले नाही आणि 2004 मध्ये दोघे वेगळे झाले.
लग्नाव्यतिरिक्त कमल हासन त्यांच्या अफेअर्समुळेही चर्चेत असतात. त्यांच्यापेक्षा 22 वर्षांनी लहान अभिनेत्री सिमरन बग्गासोबतही त्यांचे नाव जोडले गेले. पण, नंतर सिमरन बग्गाने तिच्या एका मित्राशीच लग्न केल्याची बातमी आली. याशिवाय कमल हसन 13 वर्षे अभिनेत्री गौतमीसोबत लिव्ह इनमध्येही राहिले आणि 2016 मध्ये वेगळे झाले.
अभिनेते कमल हासन त्यांच्या प्रेमप्रकरणांमुळे अनेकदा चर्चेत आले आहेत. सारिकानंतर कमल हासन 13 वर्षे अभिनेत्री गौतमीसोबत लिव्ह इनमध्ये होते आणि 2016 मध्ये वेगळे झाले. अभिनेते कमल हासन अजूनही इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. अलीकडेच त्यांच्या ‘विक्रम’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शानदार कलेक्शन केले होते. याशिवाय अभिनेत्याकडे अनेक मोठे प्रकल्प आहेत ज्यावर ते काम करत आहेत.