ग्रंथदिंडीने प्रारंभ ; संमेलनात कविसंमेलन, कथाकथन सादरीकरण
अंबाजोगाई : प्रियदर्शनी क्रिडा, सांस्कृतिक व व्यायाम मंडळाच्या वतीने अंबाजोगाईत मंगळवार दि.19 नोव्हेंबर रोजी विद्यार्थी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात विद्यार्थ्यांच्या स्वरचित किंवा त्यांना आवडलेल्या कवितांचे कविसंमेलन होणार असून कथाकथन सादरीकरणही करता येणार आहे. तरी अंबाजोगाई शहरातील सर्व शाळांनी या संमेलनात सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रियदर्शनी क्रिडा,सांस्कृतिक व व्यायाम मंडळाचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, सांस्कृतिक विभागप्रमुख दिनकर जोशी यांनी केले आहे.
विद्यार्थी साहित्य संमेलनातील कविसंमेलनात विद्यार्थ्यांना आवडणारी किंवा त्यांनी स्वतः लिहिलेल्या कविता तसेच कथाकथनात कथेचे सादरीकरण करता येणार आहे. मंगळवार, दि.19 नोव्हेंबर 2019 वेळ सकाळी 11 वाजता संमेलनास सुरूवात होईल. तत्पुर्वी प्रारंभी सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून ग्रंथ दिंडी निघुन ती संमेलनस्थळी म्हणजे लोकनेते विलासराव देशमुख सभागृह येथे येईल. सकाळी 11 वाजता साहित्य संमेलनाचे उद्घाटन होईल. दुपारी 12 वाजता कवि संमेलनास सुरूवात होईल. दुपारी 1.30 वाजता मध्यांतर होणार असून दुपारी 2 ते 3 या कालावधीत कथा-कथन सादरीकरण होणार आहे. साहित्य संमेलनाचा समारोप दुपारी 3 नंतर होईल. विद्यार्थी साहित्य संमेलनात कविसंमेलन व कथाकथन सादरीकरणात सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभागी प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांना कविसंमेलनात व कथाकथनात सहभाग घ्यावयाचा आहे. त्यांनी विनायक मुंजे (समन्वयक-विद्यार्थी साहित्य संमेलन-2019), दुरध्वनी क्र. 02446-248753 जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक विद्यालय, गुरूवार पेठ,अंबाजोगाई येथे संपर्क साधावा किंवा विनायक मुंजे -(9421341688) यांच्या या क्रमांकावरील व्हॉट्सअपवर पोस्ट करूनही आपली नांव नोंदणी करता येणार आहे.