जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत योगेश्वरीचा संघ उपविजेता

अंबाजोगाई : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचलनालय व बीड जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय यांच्यावतीने शनिवारी झालेल्या जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलांच्या गटात योगेश्वरी नूतन विद्यालयाचा संघ उपविजेता ठरला. या संघाने शिरूर कासार, पाटोदा, आष्टी येथील संघावर मात करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.

बीडच्या सैनिकी विद्यालया सोबत योगेश्वरी विद्यालयाचा अटी तटीचा खो-खो सामना झाला. त्यात योगेश्वरी विद्यालयाचा संघ उपविजेता ठरला. या संघात यश गोरे, सर्जेराव पटाईत, अनिकेत बाभूळगावकर, निहाल सय्यद, सार्थक सानप, शुभम डोंगरे, स्वप्नील डोंगरे, नैतिक ठेंबरे, आर्हम जोगदंड, यश गलांडे, श्रीअर्थ शेंगोळे यांचा समावेश होता. त्यांना मार्गदर्शन छत्रभूज ढेबरे व एस.एस. देशपांडे यांनी केले. विजयी खेळाडूंचे अभिनंदन योगेश्वरी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी डॉ.सुरेश खुरसाळे,ॲड.शिवाजीराव कराड, कमलाकर चौसाळकर,गणपत व्यास, प्रा. माणिकराव लोमटे, मुख्याध्यापिका के.टी.व्यास, अलका साळूंके, एस.के.निर्मळे, ए.आर.पाठक, विलास गायकवाड यांच्यासह आदींनी केले आहे.