शाळेच्या विद्यार्थीनीमध्ये तुफान हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

टीम AM : उत्तर प्रदेशातील बलिया परिसरातील दोन शालेय विद्यार्थीनीमध्ये तुफान हाणामारी झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दिवसाढवळ्या रस्त्याच्या मधोमध मुली एकमेकींना मारहाण करत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात ही घटना घडली आहे. मारामारीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सुरुवातीला दोघींमध्ये बाचाबाची झाली. काही वेळानंतर दोघींनी एकमेंकींनी लाथा बुकीने मारायला सुरुवात केली. स्थानिक वृत्तानुसार दोघींमध्ये बॉयफ्रेंडमुळे भांडण झाले आहे.