टीम AM : मराठा आरक्षणाबाबत घाईने कोणताही निर्णय घेण्यापेक्षा कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देऊ, असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते आज नागपूर इथं पत्रकारांशी बोलत होते.
मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी ठाम भूमिका घेतली असून आपण त्यांच्या भूमिकेसोबत असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. ओबीसी जनगणनेच्या मागणीला आमचा विरोध नाही, मात्र त्यासाठीची पद्धती निश्चित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
बिहारमध्ये या जनगणनेनंतर जी परिस्थिती निर्माण झाली तशी आपल्याकडे होऊ नये, याची काळजी घ्यावी लागेल, असं फडणवीस म्हणाले.