टीम AM : मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मात्र परवा 24 तारखेच्या आत मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेतला नाही, तर 25 ऑक्टोबरपासून पुन्हा कठोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. जरांगे यांनी आज दुपारी जालना जिल्ह्याच्या अंतरवाली सराटा इथं वार्ताहर परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली.
आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत मंत्री, आमदार, खासदार, तसंच प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना अंतरवाली सराटा इथं गावबंदी करण्यात येणार असल्याची घोषणा जरांगे यांनी केली.
आरक्षणासाठी कुणीही टोकाचं पाऊल उचलू नये, असं आवाहन करुन जरांगे यांनी शांततापूर्ण मार्गाने हे आंदोलन मराठा समाजाला आरक्षण मिळवून देईल, असा विश्वासही जरांगे यांनी व्यक्त केला.