टीम AM : राज्य सरकारने यावर्षी एसटी महामंडळाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना दिवाळीच्या निमीत्ताने भेट दिली आहे. दिवाळीपुर्वीच महिन्याचा पगार केला जाणार असून, त्यामध्ये 5000 रूपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. त्याशिवाय सण अग्रीम म्हणून 12500 रुपये देण्याला मंजुरी देण्यात आली आहे.
गेल्यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले होते. आता यंदाही एसटी कर्मचाऱ्यांना पाच हजार सानुग्रह अनुदान मिळणार आहे.
शिवाय राज्य परिवहन महामंडळातील तृतीय आणि चतुर्थ वर्ग कर्मचाऱ्यांना ज्यांचे वेतन 43477 अथवा त्यापेक्षा कमी आहे.अश अशा कर्मचाऱ्यांना सण अग्रिम म्हणून 12500 म्हणून देण्यात येणार असल्याचाही निर्णय घेतला आहे. त्यामूळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.