टीम AM : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या देशाबाहेरील सर्वात मोठ्या पुतळ्याचे अनावरण अमेरिकेतील मॅरीलँड राज्यात होत आहे. येत्या 14 ऑक्टोबर 2023 रोजी ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’ नावाने या भव्य पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरने (AIC) या पुतळ्याची उभारणी केली आहे. ही संस्था डॉ. आंबेडकर यांचे स्वातंत्र्य, समानता आणि सामाजिक न्याय या विचारांच्या प्रसाराचे काम करते.
आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरद्वारे ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’ ची स्थापना मॅरीलँडच्या ॲकोकीक येथे 13 एकरावर विकसित केलेल्या डॉ. बी. आर. आंबेडकर स्मृती पार्कात करण्यात आली आहे.
डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याची निर्मिती सुप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी केली आहे. या पुतळ्याची उंची 19 फूट इतकी आहे. राम सुतार यांनीच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या गुजरातमधील केवडीया येथील सर्वात उंच ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या पुतळ्याची उभारणी केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पुतळा जगभरातील आंबेडकर प्रेमींना प्रेरणा देणार आहे. या कार्यक्रमासाठी अमेरिकीतील डॉ. आंबडेकर यांचे अनुयायी उपस्थित राहणार आहेत.