टीम AM : शहरातील योगेश्वरी मंदिराच्या बाजूला असलेल्या राधेश्याम लॉजमध्ये तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील 19 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि. 7) दुपारी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील विवेकानंद पंडित येडे (वय 19) हा तरुण दुपारी योगेश्वरी मंदिराच्या बाजूला असलेल्या राधेश्याम लॉजमध्ये गेला होता. त्याने त्या ठिकाणी एक रुम बुक केली. रुमचा दरवाजा खूप वेळ झाला तरी उघडला नसल्याने लॉजच्या कर्मचाऱ्याने खिडकीतून पाहणी केली असता सदरील तरुणाने आत्महत्या केली असल्याचे उघडकीस आले. दरम्यान, आत्महत्या मुलीच्या प्रकरणातून झाली असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. या घटनेचा अधिक तपास अंबाजोगाई शहर पोलीस करित आहेत.