टीम AM : मोदी सरकारने देशाची अर्थव्यवस्था मोडीत काढली असून त्यांचा मित्रपरिवारचं पैशाने गर्भश्रीमंत होत आहे. तर दुसरीकडे मात्र सामान्य माणसाचे जीवन उध्वस्त होत असून देशात बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतचं आहे, त्यावर कुठलीही ठोस भूमिका मोदी सरकार घेत नाही, असा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केंद्रीय महासचिव कॉ. सिताराम येचुरी यांनी केला आहे.
अंबाजोगाईत एका कार्यक्रमासाठी कॉ. सिताराम येचुरी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना कॉ. येचुरी म्हणाले की, देशाला एकत्रित करण्यासाठी ‘इंडिया’ ची स्थापना करण्यात आली. परंतू, देश बिघडवणाऱ्या मोदी सरकारच्या पोटात या आघाडीमुळे दुखत असून ते वाटेल ते आरोप करित आहेत, याचा फायदा ‘इंडिया’ आघाडीलाचं होत आहे, असे येचुरी म्हणाले.
आरक्षणाबद्दल पत्रकारांनी विचारले असता, येचुरी म्हणाले की, देशातील जातीनिहाय जनगणना झाल्यानंतरचं आरक्षणासंदर्भात निर्णय घेता येईल. पण जातीनिहाय जनगणनेच्या मुद्याकडे मोदी सरकार दुर्लक्ष करित आहे, असाही आरोप कॉ. येचुरी यांनी केला. यावेळी कॉ. येचुरी यांच्यासोबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.