दोन हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी सात दिवसांची मुदतवाढ

टीम AM : दोन हजार रुपये मूल्याच्या चलनी नोटा बँक खात्यात जमा करणं किंवा बदलून घेण्यासाठी सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. या नोटा चलनातून मागे घेण्याचा निर्णय रिजर्व्ह बँकेनं गेल्या 19 मे रोजी जाहीर करत, आज 30 सप्टेंबरपर्यत नोटा जमा करण्याचं किंवा बदलून घेण्याचं आवाहन केलं होतं. 

19 मे रोजी चलनात असलेल्या दोन हजार रुपयांच्या तीन लाख 56 हजार कोटी रुपयांच्या नोटांपैकी तीन लाख 42 हजार कोटी रुपयांच्या नोटा जमा झाल्या असून, 14 हजार कोटी रुपयांच्या नोटा अद्याप चलनात असल्याची माहिती, रिजर्व्ह बँकेनं जारी केलेल्या पत्रकात दिली आहे. 

आठ ऑक्टोबरपासून या शिल्लक नोटा जमा करण्याची सुविधा रिजर्व्ह बँकेच्या शाखांमध्ये उपलब्ध असणार आहे, अशी माहिती रिजर्व्ह  बँकेकडून देण्यात आली आहे.