शेतकरी व जनतेचे विविध प्रश्‍न सोडवा – राजकिशोर मोदी

बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील शेतकरी वर्ग व जनतेचे विविध प्रश्‍न यांची सोडवणूक व्हावी यासाठी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.सदरील प्रश्‍नांची सोडवणूक झाली नाही तर या प्रश्‍नी तीव्र आंदोलनाचा इशारा बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी प्रशासनाला दिला आहे. सोमवार,दि.11 नोव्हेंबर रोजी राजकिशोर मोदी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतकर्‍यांचा गतवर्षीचा व यावर्षीचा वीमा तात्काळ मिळणे बाबत, दुष्काळ अनुदान तात्काळ मिळणे बाबत,शहरातील वीज पुरवठा सुरळीत करावा, बांधकाम विभागामार्फत शहरातील रस्ते नव्याने निर्माण करावेत, शहर वाहतूक सुरळीत या प्रमुख मागण्यांचा निवेदनात समावेश आहे .निवेदनाच्या प्रती तालुका कृषी अधिकारी, पोलिस निरिक्षक, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण कार्यालय यांना माहितीस्तव देण्यात आल्या आहेत.