गणेशोत्सव : भक्तांचा उत्साह वाढविण्यासाठी ‘गाजणार पुत्रेश्वर’ गाण्याची निर्मीती 

टीम AM : अंबाजोगाई शहरातील प्रसिद्ध ‘पुत्रेश्वर’ गणेश मंडळाच्या वतीने यावर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणेश भक्तांचा उत्साह वाढविण्यासाठी ‘गाजणार पुत्रेश्वर’ या नवीन गाण्याची निर्मीती केली असून हे गाणं सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हरायल होत आहे. 

मागील अनेक वर्षांपासून शहरातील गणेशोत्सवात महत्वाचे स्थान निर्माण करणाऱ्या ‘पुत्रेश्वर’ गणेश मंडळाच्या वतीने खास गणेशोत्सवाच्या निमित्ताने  तयार करण्यात आलेल्या या गाण्याचे बोल ‘गाजणार पुत्रेश्वर’ असून हे गाणं वैभव काळे व ओंकार रापतवार यांनी लिहिले आहे, गाण्याला संगीत ‘बाॅम’ स्टुडिओचे ओंकार रापतवार यांनी दिले आहे. हे गाणं राजकुमार गाडवे व रूचा कुलकर्णी यांनी गायले असून रूग्वेद कुलकर्णी यांनी गाण्याची मिक्सिंग केली आहे. 

‘पुत्रेश्वर’ गणेश मंडळाचा गणेश मुर्ती आगमन सोहळा अतिशय भव्यदिव्य झाला होता. याची शहरासह तालुक्यात प्रचंड चर्चा होत आहे. यासाठी गणेश मंडळाचे अध्यक्ष हर्ष जाधव, उपाध्यक्ष शुभम आपेट, सचिव अनिकेत टेकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व गणेश मंडळाचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.