मायलेकरावर धारदार शस्त्राने वार : बापाची आत्महत्या, सुगाव येथे घडली घटना

टीम AM : अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या सुगाव येथील नरसिंह पवार यांनी स्वतःच्या मुलावर व पत्नीवर धारादर शस्त्राने वार करून स्वतः आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडलीय. नरसिंग रानबा पवार (वय 55, रा. सुगाव) असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. 

या बाबत प्राप्त माहिती अशी की, परवा नेहमीप्रमाणे सर्वजण घरी झोपले असताना नरसिंग पवार यांनी मुलगा व्यंकटेश पवार (वय 28) आणि बायकोवर धारदार शस्त्राने वार केले, यात व्यंकटेश याच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली असून बायको किरकोळ जखमी झालीय. या दोन्ही मायलेकरावर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

दरम्यान, बायको व मुलावर वार केल्यानंतर घरी कोणी नसल्याने नरसिंग पवार यांनी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केलीय. नरसिंग पवार यांचे शवविच्छेदन केल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, मुलावर आणि बायकोवर हल्ला का केला ? याची माहिती समोर आलेली नाही. या घटनेचा अधिक तपास बर्दापूर पोलीस करित आहेत.