टीम AM : गणपती बाप्पाचं उत्साहात स्वागत करण्यासाठी सप्तसूर म्युझिकने ‘मोरया’ या नव्याकोऱ्या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. मराठी बिगबॉस फेम सोनाली पाटील आणि इन्स्टाग्रामवरील कंटेट क्रिएटर धनंजय पोवार या म्युझिक व्हिडिओमध्ये आहेत.
सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष आणि बीना राजाध्यक्ष यांनी ‘मोरया’ या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. स्टिवन पोल्स यांनी दिग्दर्शित केलेल्या या म्युझिक व्हिडिओचं गीतलेखन, संगीत आणि गायन विकी वाघ यांनी केलं आहे.
सोनाली पाटील, धनजंय पोवार यांच्यासह पार्थ केंद्रे, अमन कांबळे, समरवेर शाह, राजवीर पावसकर यांचाही या म्युझिक व्हिडिओमध्ये सहभाग आहे.