राज्यातील विविध विभागांत लवकरच दीड लाख पदांची भरती : अजित पवार

टीम AM : राज्यातील विविध विभागात दीड लाख पदांची भरती लवकरच करण्यात येणार आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. या संदर्भात मंत्रालयात बैठका सुरू असून, लवकरच यासंदर्भात निर्णय घेतल जातील, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

अजित पवार हे वारंवार काही ना काही घटनेवरून ट्रोल होत आहेत. दरम्यान, त्यांनी मी काल दिवसभर राज्यांतील नोकरभरती संदर्भातील बैठकीत होतो, असे सांगितले. तसेच राज्यातील आरोग्य, शिक्षणासह अनेक विभागात 1.5 लाख नोकरभरती होणार आहे, असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

आरोग्य सेवा अत्यावश्यक सेवा असल्याने या विभागातील डॉक्टर, नर्सेस, अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त होण्यापूर्वी, त्यांच्या पदांसाठी किमान 3 महिने आधी भरती प्रक्रिया सुरू करावी, अशी सूचना देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे.