धक्कादायक : पती – पत्नीची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या, बीड जिल्ह्यातील घटना

टीम AM : पती – पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील जातेगावात घडली आहे. घराचा दरवाजा बंद केल्याने लहान मुलीने दरवाजा बंद असल्याचे पाहून आरडाओरडा केला. त्यावेळी आसपासच्या नागरिकांनी घराचा पत्रा उचकटून पाहिल्यानंतर सदरील प्रकार उघडकीस आला. 

राजू चव्हाण आणि सोनाली चव्हाण असे आत्महत्या केलेल्या पती – पत्नीचे नाव आहे. आत्महत्या का केली ? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

तलवाडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, जमादार नारायण काकडे हे घटनास्थळी दाखल झाले होते. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.