टीम AM : पिंपरी – चिंचवडच्या चिखलीमधील हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 2 लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती आहे.
दरम्यान, ही भीषण आग शॉर्ट सर्कीटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याच हार्डवेअरच्या दुकानामध्ये एक कुटुंब वास्तव्यास असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या भीषण आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर आणखी एक व्यक्ती अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशामक दलाचा आहे. पिंपरी – चिंचवड अग्निशामक दलानं ही आग नियंत्रणात आणली असून, कुलिंगचे काम सुरु आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.