आधीच विवाहित असूनही बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीवर फिदा झाला होता नागार्जुन! वाचा…

टीम AM : इंडस्ट्रीतील सुपरस्टार नागार्जुन आज (29 ऑगस्ट) आपला वाढदिवस साजरा करत आहे. केवळ साऊथ इंडस्ट्रीमध्ये बनत असलेल्या चित्रपटांमध्येच नाही, तर नागार्जुनने आपल्या करिअरमध्ये अनेक बॉलिवूड चित्रपट केले आहेत, जे आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत. पण, बॉलिवूडमध्ये काम करत असताना नागार्जुन एका सुंदर अभिनेत्रीच्या प्रेमात पडला होता. नागार्जुन जिच्या सौंदर्यावर फिदा झाला, ती अभिनेत्री तब्बू होती. एकेकाळी नागार्जुन आणि तब्बूच्या नात्याची बॉलिवूडच्या कॉरिडॉरमध्ये बरीच चर्चा होती. चित्रपटाच्या सेटवरून सुरू झालेली ही प्रेमकहाणी काहीच वर्षांत संपुष्टात आली होती.

नागार्जुन आणि तब्बू यांची पहिली भेट ‘निन्ने पेल्लादाता’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. दोघेही केवळ कामानिमित्त भेटत असले, तरी हळूहळू दोघेही एकमेकांचे छान मित्र झाले. यानंतर दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले. आजही मीडिया रिपोर्ट्समध्ये असं म्हटलं जातं की, जेव्हा नागार्जुन आणि तब्बूचं अफेअर सुरू झालं, तेव्हा अभिनेत्याच्या पत्नीला याची काहीच माहिती नव्हती. दोघांनी खूप दिवस एकमेकांना गुपचूप डेट केले होते.

मात्र, एका मुलाखतीदरम्यान तब्बूनेच नागार्जुनसोबतच्या अफेअरची कबुली दिली होती. नागार्जुनसोबत माझे नाते खूप खास असल्याचे अभिनेत्रीने म्हटले होते. मी आणि तो एकमेकांच्या खूप जवळ होतो, असे देखील तिने सांगितले होते. नागार्जुन आणि तब्बूने ‘आविदे मां आवडा’, ‘निन्ने पेल्लादथा’ आणि ‘सिसिंद्री’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. चित्रपटांमध्ये एकत्र काम करताना दोघांमधली ही जवळीक आणखीनच वाढत गेली.

मुंबईत काम करणाऱ्या तब्बूने नागार्जुनच्या जवळ जाण्यासाठी तो राहत असलेल्या शहरांत अर्थात हैदराबादमध्ये एक घरही विकत घेतले. नागार्जुनचे देखील तब्बूवर खूप प्रेम होते. पण, अभिनेता आधीच विवाहित होता आणि त्याला त्याच्या पत्नीला घटस्फोटही द्यायचा नव्हता. तब्बूने नागार्जुनला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो फोल ठरला. नागार्जुनच्या या जिद्दीमुळे तब्बूने हे नाते हळूहळू संपवणे योग्य समजले. तब्बू ही इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर आणि स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक आहे यात काहीच शंका नाही. पण, नागार्जुनसोबतचे नाते संपुष्टात आल्यानंतर तब्बूने सिंगल राहणेच पसंत केले. अभिनेत्री तब्बू आजही अविवाहित आहे.