महागाईने होरपळणाऱ्या जनतेला दिलासा : घरगुती गॅस सिलिंडर 200 रुपयांनी स्वस्त

टीम AM : घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवर 200 रुपये सबसिडी देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. महागाईने होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने रक्षाबंधन आणि ओणमच्या दिवशी मोठी घोषणा केली आहे. 

गॅस सिलिंडरच्या किमतीत सर्व ग्राहकांना 200 रुपयांपर्यंत सबसिडी दिली जाईल. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आधीपासून मिळत असलेल्या 200 रुपयांच्या अनुदानाव्यतिरिक्त 200 रुपये वेगळे अनुदान दिले जाईल. म्हणजेच त्यांना गॅस सिलिंडरवर 400 रुपयांची सूट मिळणार आहे. 

रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही घोषणा केली.