बॅकग्राऊंड डान्सर होती डेझी : ‘या’ अभिनेत्याची पडली नजर, वाचा…

टीम AM : प्रसिद्ध अभिनेत्री डेझी शाह हिचा आज वाढदिवस आहे. 25 ऑगस्ट 1984 रोजी जन्मलेल्या डेझीने वयाची 40 वर्षे पूर्ण केली आहेत. ‘जय हो’ या सिनेमाद्वारे डेजीने अभिनय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. पहिल्याच सिनेमात तिला बॉलिवूडचा दबंग अर्थातच अभिनेता सलमान खानसोबत स्क्रिन स्पेस शेअर करण्याची संधी मिळाली. पण नंतर मात्र तिला फारसे चांगले सिनेमे मिळाले नाहीत किंवा तिच्या सिनेमांची फारशी चांगली कामगिरी झाली नाही. 

बॅकग्राऊंड डान्सर होती डेझी.. 

डेझी सर्वात आधी 2003 मध्ये रिलीज झालेल्या सलमान खान स्टारर ‘तेरे नाम’ या सिनेमात बॅकग्राउंड डान्सरच्या रुपात दिसली होती. तिने आपल्या करिअरची सुरुवात कोरिओग्राफर गणेश आचार्यची असिस्टंट म्हणून केली होती. 

सलमानने ऑफर केली भूमिका

‘मैंने प्यार क्यों किया’ या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सलमानची नजर डेझीवर पडली. सलमानने डेझीला सर्वप्रथम ‘बॉडीगार्ड’ या सिनेमात करीनाच्या मैत्रिणीचा रोल ऑफर केला होता. मात्र तिने ती भूमिका नाकारली. त्यानंतर ती ‘जय हो’ मध्ये सलमानच्या अपोझिट दिसली.

‘जय हो’ या सिनेमात तिचा फॅटी लूकसुध्दा क्रिटीसाइज करण्यात आला होता. परंतू, कमी वेळेतच डेझीने स्वत:ला पूर्णत: बदलले आणि बनली ‘हेट स्टोरी 3’ ची सेंसुअस लेडी. तिच्या या नवीन लूकला पाहून लोकांना विश्वास बसला नव्हता, ही पूर्वीची डेझी शाह आहे.